एका दिवसातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 11 हजाराच्या जवळ, हिंदुस्थानने युकेलाही मागे टाकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका दिवसातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात आतापर्यंतची मोठी वाढ झाली आहे. गेला आठवडाभर नऊ हजाराच्या आसपास असलेला आकडा हा आज थेट अकरा हजाराच्या आसपास पोहोचला आहे. गेल्या 24 तासात देशात 10956 कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून 396 जणांचा मृत्यू झाला आहे.

देशात सध्या 2,97,535 वर पोहोचला आहे. कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात हिंदुस्थान आता जगभऱात चौथ्या स्थानावर पोहोचला असून हिंदुस्थानने चीन, स्पेन नंतर आता युकेला देखील मागे टाकले आहे. त्यामुळे आता देशातील वाढणारा आकडा हा चिंताजनक बनत चालला आहे.सध्या देशात 1,41,842 अॅक्टिव्ह रुग्ण असून 1,47,195 रुग्ण बरे झाले आहेत. तर 8498 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.