कोरोना व्हायरसचा थैमान वाढतेय, मृतांचा आकडा 132 वर

752
प्रातिनिधिक फोटो

चीनमध्ये कोरोना व्हायरसने घातलेले थैमान वाढतच असून आतापर्यंत या व्हायरसमुळे 132 लोकांचा मृत्यू झाला आहे. वुहान शहरातील हुबेई भागातच गेल्या 24 तासात 25 जणांचा मृत्यू झाला आहे. या व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या देखील सहा हजारापर्यंत पोहोचली आहे.

चीनमध्ये आतापर्यंत 31 प्रांतामध्ये कोरोना व्हायरस पसरला आहे. चीनच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 132 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 5974 जणांना या व्हायरसची बाधा झाली आहे. त्यातील 1239 जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आक़डा येत्या 10 दिवसात मोठ्या प्रमाणात वाढू शकतो अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. 9239 जणांना या व्हायरसची लागण झाल्याची शक्यता असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच आतापर्यंत 103 जणं या आजारातून बरे देखील झाले आहेत.

कोरोना व्हायरसच्या वाढत्या रूग्णांमुळे चीन सरकारने 10 दिवसांत 1000 खाटांचे रुग्णालय बांधण्याची घोषणा केली आहे. कोरोना व्हायरस सर्वात जास्त चीनमधील वुहान शहरात पसरला आहे. त्यामुळे हॉस्पिटल या शहराच्या बाहेर बांधण्यात येणार आहे. कोरोना व्हायरसची लागण झाल्याची पहिली घटना 31 डिसेंबर रोजी उघडकीस आली होती. हा आजार 2003 मध्ये पसरलेल्या सीव्हिअर अॅक्यूट रेसिपिरेट्री सिंड्रोम म्हणजे सार्स सारखाच धोकादायक असल्याचे मानले जाते.

आपली प्रतिक्रिया द्या