देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 22,752 ने वाढला

927

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 22, 752 ने वाढला असून आतापर्यंतचा आकडा 7,42,417 झाला आहे. देशात सध्या 2,64,944 अॅक्टिव्ह कोरोनाग्रस्त असून 4,56,831 रुग्ण बरे झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आकडेवारी जाहीर केली आहे. देशात गेल्या 24 तासात 482 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 20,642 जणांचा मृत्यू झाला आहे.

सध्या देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात असून त्या्खालोखाल दिल्ली व तामिळनाडूत आहेत. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 3296 रुग्ण बरे होऊन घरे गेले असून बरे होणऱ्यांची एकूण संख्या 1 लाख 18  हजार 558 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 54.6 टक्के इतका आहे. 5134 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 89 हजार 294 रुग्णांवर उपचार सुरू असून कोरोनाबांधितांची 2 लाख 17  हजार 121 झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या