कोरोना व्हायरसचा धुमाकूळ, 32 देशांत 78 हजार लोकांना लागण

544
प्रातिनिधीक फोटो

गेल्या तीन महिन्यांपासून कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून हा व्हायरस चीनमधून तब्बल 32 देशांमध्ये पसरला आहे. कोरोनाची आतापर्यंत जगभरातील 78 हजार जणांना लागण झाली असून व्हायरस पहिल्यांदा जिथे सापडला त्या चीनमध्ये रविवारी 97 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे चीनमधील एकूण बळींची संख्या 2 हजार 442 वर पोहचली आहे. दरम्यान, चीनमध्ये 31 प्रांतांमध्ये हा व्हायरस पसरला असून त्याची 76 हजार 936 जणांना लागण झाली आहे.

चीनमध्ये या व्हायरसमुळे राष्ट्रीय आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली असून या व्हायरसला प्रतिबंध करण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहे. चीनमधून याची लागण पश्चिम आशियातील देश इराण-इजिप्त, दक्षिण कोरिया तसेच युरोपमधील काही देशांमध्ये झाली आहे. इटलीतील 12 शहरे बंद करण्यात आली आहेत. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ)पथक मोठय़ा प्रमाणात लागण झालेल्या वुहान शहरात पोहचले असून त्यांच्याकडून सखोल तपास करण्यात येत आहे.

क्रुझवरील 12 हिंदुस्थानींना लागण
जपानच्या किनाऱयावरील योकोहामा बंदरावर 3 फेब्रुवारीपासून थांबवलेल्या ‘डायमंड प्रिन्सेस’ क्रुझमधील आणखी 4 हिंदुस्थानी कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाल्यामुळे हिंदुस्थानींची संख्या 12 वर पोहचली आहे. जपानच्या किनाऱयावर थांबलेल्या क्रुझवर एकूण 3 हजार 711 प्रवासी असून त्यात 138 हिंदुस्थानी आहेत. या हिंदुस्थानींमध्ये 132 कर्मचारी तर 6 प्रवासी आहेत. वैद्यकीय चाचणीनंतर क्रुझमधील सर्व प्रवाशांना उतरवण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या