देशात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांच्या आकड्यात वाढ, वाचा आजची आकडेवारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो- प्रातिनिधीक

देशात गेल्या 24 तासात कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात 9985 ने वाढ झाली असून देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकडा 2,76,583 वर पोहोचला आहे. मात्र आज या आकड्यात दिलासा देणारी देखील एक बाब आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या अॅक्टिव्ह रुग्णांच्या आकड्यापेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या जास्त असल्याचे समोर आले आहे.

देशात सध्या 1,33,632 कोरोनाग्रस्त असून 1,35,206 रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या 24 तासात 279 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.त्यामुळे देशातील मृतांचा आकडा 7745 वर पोहोचला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

सध्या देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात असून राज्यातच सध्या कोरोनाचे 90 हजार रुग्ण आहेत. यात 44860 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर 3289 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत सध्या 31,309 कोरोनाग्रस्त असून त्यातील 18543 रुग्ण आहेत.