… तर कोरोना रुग्णांना आयसोलेशनसाठी हा पर्याय वापरा, बिग बी यांनी सांगितली आयडिया

कोरोना व्हायरसचा वाढता धोका पाहता संपूर्ण देश 121 दिवस अर्थात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ही घोषणा केली. लॉकडाऊनबाबत सामान्य नागरिकासह सेलेब्रिटी देखील फोटो, व्हिडीओ शेअर करून, ट्विट करून जनजागृती करत आहेत. सोशल मीडियावर कायम सक्रिय असणारे बिग बी अमिताभ बच्चन देखील ट्विट करून कोरोना बाबत अपडेट शेअर करत असतात. नुकतेच त्यांनी एक ट्विट केले असून जर कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी रुग्णालय अपुरे पडले तर काय करायला हवे याबाबत आयडिया सांगितली आहे.

अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला असून यावर ती आयडिया लिहिण्यात आलेली आहे. माझ्यामते ही आयडिया फायदेशीर आहे. एक व्यक्तीने इन्स्टाग्रामवर ही पोस्ट शेअर केली होती. हा फोटो बिग बी यांनी शेअर केला असून यात म्हंटले आहे की, ‘एक आयडिया असून प्रशासनाला ती पाठवण्यात येऊ शकते. लॉकडाऊनमुळे सर्व रेल्वे सेवा बंद आहे. रेल्वेच्या बोगी सध्या जागेवर उभ्या आहेत. प्रत्येक बोगीत 20 रुम आहेत, आणि याचा वापर केला जाऊ शकतो. 3 हजार रेल्वे असून याच हिशोबाने 60 हजार रूम आहेत. या सर्व बोगीचा वापर कोरोना संक्रमित रुग्णांना आयसोलेट करण्यासाठी केला जाऊ शकतो. रुग्णालय कमी पडल्यास ही आयडिया वापरू शकतात.’

screenshot_2020-03-25-21-59-14-361_com-android-chrome

दरम्यान, देशातील कोरोना रुग्णांचा आकडा फुगत आहे. बुधवारी हा आकडा 600 पार गेला असून 11 लोकांचा मृत्यू झाला आहे, तसेच 40 पेक्षा जास्त रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या