कोरोनाचा धोका सांगणाऱ्या डॉक्टरचा कोरोनानेच मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प

चीनमध्ये हजारो नागरिकांचे बळी घेणाऱ्या जीवघेण्या कोरोना व्हायरसच्या धोक्याबाबत जगाला सर्वप्रथम सांगणाऱ्या डॉक्टरचाच आज करुण अंत झाला आहे. ली वेनलियांग असे या 34 वर्षीय डॉक्टरचे नाव आहे. चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती दिली आहे.

कोरोनासारखा भयंकर विषाणू चीनमध्ये आला असून हा आजार जीवघेणा असल्याची माहिती डॉ. ली वेनलियांगसह आठ डॉक्टरांनी दिली होती. वेनलियांग देखील आता या आजाराचे बळी पडले आहेत. गरुवारी रात्री वुहान येथे त्यांचे निधन झाले. डिसेंबरला वुहानला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्याबाबतचा अहवाल वेनलियांग यांनी मेडिकल स्कूलच्या ग्रुपला दिला होता. या आजारापासून सर्वांना सावध करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या होत्या. काही तासांतच त्यांचे हे स्क्रीनशॉट व्हायरल झाले होते. त्यावेळी अफवा पसरविल्याचा आरोप पोलिसांकडून वेनलियांगवर ठेवण्यात आला होता.