जर्मनीत लॉकडाऊन वाढवला; 14 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

जर्मनी येथे कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता तेथील लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. चान्सलर एंजेला मार्पेल यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. शहरातील परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकारसोबत झालेल्या चर्चेअंती हा निर्णय घेण्यात आला आहे. तत्पूर्वी, 31 जानेवारीपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. आता त्यास मुदतवाढ देऊन 14 फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी होत असल्याने मार्पेल यांनी समाधान व्यक्त केले आहे. शहरात ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे रुग्ण आढळून येण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने सतर्पतचा इशारा दिला असल्याचे मार्पेल यांनी सांगितले.

 

आपली प्रतिक्रिया द्या