कोरोनाच्या मागे हात धुवून लागा!

हिंदुस्थानात कोरोनाचा विस्फोट झाला असून दररोज चार लाखांहून अधिक लोकांना संसर्ग झाल्याचे समोर येत असून मृतांचा आकडाही मोठा आहे. त्यामुळे कोरोनाचा पराभव करण्यासाठी सरकारचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेतच. त्यामुळे त्याचा पराभव नक्कीच होईल. पण तत्पूर्वी प्रत्येक नागरिकांना आपल्यापासून कोरोनाला दोन हात लांब ठेवण्यासाठी काही कर्तव्ये पार पाडणे आवश्यक आहे.

  • कोरोनाला दोन हात लांब ठेवण्यासाठी कमीत कमी 20 सेकंद साबणाने वारंवार हात धुवावेत.
  • वारंवार साबणाने हात धुणे शक्य नसेल तर 60 टक्के अल्कोहोलयुक्त सॅनिटायझरने हात साफ करावेत.
  • हात योग्यरीत्या साफ करण्यासाठी चार-पाच मिली सॅनिटायझर हातावर घेऊन दोन्ही हात एकमेकांवर सर्व बाजूंनी सॅनिटायझर सुकेपर्यंत चोळावेत.
  • आपण वापरत असलेल्या वस्तू मेडिकल क्लीनर किंवा वाईपच्या मदतीने सॅनिटाइझ करून घ्याव्यात.
  • दुसऱयाने वापरलेल्या वस्तू वापरणे कटाक्षाने टाळावे.

आपले हात साफ करण्यासाठी अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर असायला हवा. कारण कोरोना विषाणूला बाहेरून आवरण असते. ते तोडण्यासाठी किंवा निष्क्रिय करण्याकरिता 60 टक्क्यांपेक्षा जास्त अल्कोहोलचा समावेश असलेला सॅनिटायझर योग्य आहे.

आपली प्रतिक्रिया द्या