कोरोनावर दोन स्वदेशी लसी, मानवी चाचणी सुरू, प्राण्यांवरील चाचणी यशस्वी

1050

देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना सर्वांचे लक्ष हे कोरोनाच्या लसीवर लागून राहिले आहे. रशियाने यात बाजी मारल्यानंतर आता हिंदुस्थानाच्या दोन लसींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून हिंदुस्थानच्या दोन लसींची उंदीर, सशांसारख्या प्राण्यांवरील चाचणी यशस्वी झाल्याची माहिती भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्थेचे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी दिली आहे. तर लवकरच या लसीची मानवी चाचणी सुरु करण्यात येणार असून या चाचणीच्या अभ्यासाचे नमुने ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे सोपविण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली आहे.

जगभरात कोरोनाचे संसर्ग वाढत चालले आहे. जगभरातील शास्त्रज्ञांनी यासाठी लस शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आहेत. यात रशियातील शास्त्रज्ञांना यश मिळाल्यानंतर आता हिंदुस्थानासाठी गूडन्यूज आली आहे. चीनमध्ये लसीवर वेगाने अभ्यास केला जात आहे. अमेरिकेतही दोन लसींवर वेगाने काम सुरू आहे. अमेरिकेने दोन लसींच्या प्रक्रियेला फास्टट्रॅकवर आणले आहे. ब्रिटनचेही ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या लसीवर वेगाने काम सुरू केले आहे. मानवासाठी लस बनवण्यासाठी तत्पर आहेत. तर दुसरीकडे हिंदुस्थानातील दोन लसी या कोरोनाविरोधात प्रभावकारी ठरत असल्याचे दिसून येत आहेत. या लसीची प्राण्यांवरील चाचणी पूर्ण करण्यात आल्यानंतर आता मानवी चाचणी सुरु करण्यात आली आहे.

हजार जणांची चाचणी
या दोन्ही लसींच्या मानवी चाचाणीला परवानगी देण्यात आली असताना याकडे उभ्या जगाचे लक्ष लागून राहिले आहे. या लसीच्या मानवी चाचणी करताना किमान १-१ हजार नागरिकांचा क्लिनिकल स्टडीही करण्यात येत आहे. जगभरात वापरण्यात येणाऱ्या लसींपैकी ६० टक्के लस या हिंदुस्थान बनवतो. ही गोष्ट जगातील प्रत्येक देशाला माहिती आहे. यामुळे हे सर्व देश हिंदुस्थानच्या संपर्कात आहेत, अशी माहिती भार्गव यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या