गावी गेलेल्या नवी मुंबईकरांची परवड; घरापासून 20 किलोमीटरवर केले क्वॉरंटाईन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवी मुंबईतून आपल्या मूळ गावी सातारा जिल्ह्यात गेलेल्या नवी मुंबईकरांची परवड होत आहे. या नागरिकांना होम क्वॉरंटईन करण्याऐवजी घरापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या निवारा केंद्रात ठेवण्यात आले आहे. कामोठे परिसरात राहणारे एक कुटुंब 6 एप्रिल रोजी आपल्या मूळ गावी दहिवडी तालुक्यातील बनगरवाडीत गेले आहे. त्यांचे घर शेतामध्ये आहे. राज्यात अनेक ठिकाणी शहरातून ग्रामीण भागात आलेल्या नागरिकांची आरोग्य विभागाने वैद्यकीय तपासणी करून त्यांना घरात राहण्याचा सल्ला दिला आहे. काही ठिकाणी अशा नागरिकांच्या हातावर होम क्वॉरंटईनचे शिक्के मारण्यात आले आहे. मात्र, बनगरवाडीत गेलेल्या नवी मुंबईकरांची रवानगी थेट म्हसवड येथील निवारा केंद्रात करण्यात आली आहे. त्यांच्या नावाची यादी या भागातील अनेक व्हाट्सएपच्या ग्रुपवर झळकत असल्याने या नागरिकांना मनस्ताप होत आहे.