चिपळूण व संगमेश्वरमध्ये कोरोनाबाधित सापडले, दोन्ही रुग्ण मुंबईतून आल्याचे उघड

1430

रत्नागिरी जिल्ह्यात दोन नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. हे दोन्ही रूग्ण मुंबईतून आले आहेत. चिपळूणमध्ये  एक पॉझिटिव्ह रुग्ण सापडला होता त्यापाठोपाठ  संगमेश्वरमध्येही एक रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह सापडला आहे अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली आहे.  संगमेश्वर येथील व्यक्ती ठाणे येथून तर चिपळूण येथे सापडलेली कोरोनाबाधित व्यक्ती मुंबईतून आली आहे. यापूर्वी रत्नागिरीत सहा कोरोनाबाधित रूग्ण सापडले होते.त्यापैकी पाच जण बरे झाले तर खेड येथील एका रूग्णाचा मृत्यू झाला होता.

संगमेश्वर तालुक्यातील एक महिला कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदरची महिला ठाण्यातून गावी आली होती. याबाबत तहसील कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, सदरची महिला आपल्या कुटुंबासह 21 एप्रिलला बामणोलीत आली होती. तिच्यासह एकूण 9 जण आले होते. तिच्या भावाचे उत्तरकार्य करण्यासाठी कुटुंबासह ही महिला गावी आली होती. याची माहिती मिळताच स्थानिकांनी ती तालुका प्रशासनाला दिली त्यानंतर लगेच 22 एप्रिल रोजी या सर्वांना साडवलीमधील ठाकरे हायस्कूल मधे क्वॉरंटाइन करण्यात आले होते. दोन दिवसापूर्वी या सर्वांसह एकूण 30 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यात या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या महिलेला जिल्हा कोव्हिड रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. सदरची महिला व ते कुटुंब बामणोली गावात फिरल्याने हा परिसर सील करण्याची कार्यवाही सुरु झाली आहे
आपली प्रतिक्रिया द्या