नयनताराची कोरोनाविरूद्धच्या लढ्यासाठी 20 लाखांची मदत

786
09. नयनतारा

कोरोनाविरूद्धच्या लढ्यासाठी आर्थिक बळही गरजेचे असून अनेक जण त्यांना शक्य असेल त्या पद्धतीने यासाठी मदत करत आहे. देशातील उद्योगपतींनी सढळ हस्ते सहाय्यता निधीसाठी रक्कम दिली आहे. दाक्षिणात्य कलाकारही यामध्ये आघाडीवर असून त्यांनीही मोठी रक्कम सहाय्यता निधीसाठी उभी केली आहे. या कलाकारांच्या यादीमध्ये देखणी अभिनेत्री नयनताराचीही भर पडली आहे. तिने या लढ्याला आर्थिक पाठबळ म्हणून 20 लाखांची मदत जाहीर केली आहे.

नयनताराने कोरोनामुळे सध्या बंद असलेल्या चित्रपटसृष्टीतील कामगारांना आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी ही रक्कम दिली आहे. दक्षिण हिंदुस्थानातील चित्रपट कर्मचारी महासंघाला तिने ही रक्कम दिली आहे. तिच्याप्रमाणे ऐश्वर्या राजेश आणि विजय सेतुपती यांनीही या कामगारांना मदत व्हावी या उद्देशाने निधी दिला आहे. चित्रपटाच्या सेटवर झटणारे अनेकजण असतात. लॉकडाऊनमुळे आणि सध्या रोजगार नसल्याने यातील अनेकांवर आर्थिक संकट ओढावलं आहे. त्यांना आधार म्हणून तिथले कलाकार काही रक्कम महासंघाला देत आहेत. तिथल्या काही कलाकारांनी रोख रकमेऐवजी अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा कामगारांना पुरवठा केला आहे. या संकटसमी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे कलाकारांनी त्यांना शक्य असेल तशी गरिबांसाठी मदत करावी असं आवाहन महासंघातर्फे करण्यात आलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या