भाडे मागितले म्हणून मालकाला झोडपले

1263
प्रातिनिधिक फोटो

जगभरात कोरोना आजाराच्या विषाणूने थैमान घातले आहे. हिंदुस्थानात याचा फैलाव थांबवण्यासाठी देशभरात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. यामुळे हातावर पोट असणाऱ्यांचे आणि व्यावसायिकांच्या समोर असणाऱ्या अडचणी वाढल्या आहेत. उत्पन्न नसल्याने अनेकांना भाड्याचे पैसे देणं जमत नाहीये. ज्या जागामालकांची परिस्थिती चांगली आहे त्यांनी भाडेकरूंना दिलासा दिला आहे, मात्र ज्या मालकांची परिस्थितीही बिघडायला लागली आहे त्यांनी भाडेकरूंकडे भाड्याचे पैसे मागायला सुरुवात केली आहे. गेवराई तालुक्यामध्ये भाडे मागितल्याने मालकाला भाडेकरून बेदम चोपल्याची घटना घडली आहे.

गेवराई तालुक्यातील तळेवाडी येथे किसन साहेबराव थोटे यांच्या मालकीचे हॉटेल आहे. लॉकडाऊनमुळे सध्या हे हॉटेल बंद आहे. असं असतानाही माझे थकलेले भाडे दे असं म्हणत थोटे यांनी भाड्याने हॉटेल चालवणाऱ्या विलास साहेबराव माने यांच्याकडे तगादा लावला होता. या तगाद्यामुळे वैतागलेल्या माने यांनी मालक किसन साहेबराव थोटे यांना झोडपून काढले. या प्रकरणी माने यांच्याविरोधात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या