BAMU मध्ये ‘ कोरोना ‘ संसर्ग प्रयोगशाळा उभारणार, कुलगुरू डॉ.प्रमोद येवलेंची माहिती

456

कोरोना साथ ही आंतरराष्ट्रीय आपत्ती असून या संदर्भात सामुहिक प्रयत्न, उपायोजना होणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासन प्रयोगशाळा उभारणी करणार आहे. तसंच राष्ट्रीय सेवा योजनेच्या माधमातून मदत कार्य करण्याचेही विद्यापीठाने ठरवले आहे , असे प्रतिपादन कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी केले. या संदर्भात डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संवैधानिक आधिकारी, अधिष्ठाता यांच्याशी कुलगुरू प्रमोद येवले यांनी गुरुवारी रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. परीक्षा ते अॅकडमिक कॅलेंडर आदी विविध विषयावर आढावा बैठकीत चर्चा झाली . यामध्ये प्र-कुलगुरू डॉ. प्रवीण वक्ते, कुलसचिव डॉ . जयश्री सूर्यवंशी, अधिठाता डॉ भालचंद्र वायकर, डॉ . वाल्मिक सरवदे, डॉ प्रशांत अमृतकर, परीक्षा मंडळाचे संचालक डॉ गणेश मंझा आदी सहभागी झाले होते. यावेळी कुलगुरु डॉ.प्रमोद येवले म्हणाले की ‘ कोरोना साथीच्या पार्श्वभमीवर आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन येत्या 14 एप्रिलपर्यंत विद्यापीठ परिसर पुर्णतः बंद ठेवण्यात आलेला आहे. या काळात विद्यापीठ मुख्य परिसर येथील सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभाग पुर्णतः बंद असले तरी वर्क फ्रॉम होम सुरू आहे.’

कोरोना विषाणुचा (कोव्हीड-१९) प्रादुर्भाव/प्रसार विद्यापीठ परिसर, वसतिगृहे, कार्यालयामध्ये होऊ नये तसेच अधिकारी,कर्मचारी, विद्यार्थी यांना त्याचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. 14 एप्रिल 2020 पर्यत आपत्कालीन परिस्थिती म्हणून विद्यापीठ परिसर बंद असला तरी लॉकडाऊन उठण्याबाबतचे पुढील चित्र अजूनही अस्पष्ट आहे . शिक्षकांनी तोपर्यंत घरी बसून प्रश्नपत्रिका, पेटसाठी प्रश्न पेढी तयार करावी . सिस्को वेबेक्स मिटींग अॅपच्या माध्यमातून झालेल्या या ऑनलाईन आढावा बैठकीत विविध विषयावर चर्चा झाली . या मध्ये नियोजीत परीक्षा, निकाल, एमफिल – पीएचडी प्रवेशपूर्व परीक्षा, अॅकडमीक ऑडिट, वर्क फ्रॉम होम, रासेयोच्या माध्यमातून कार्य आदी विषयावर बैठक झाली.राष्ट्रीय सेवा योजनेतंर्गत आपत्ती व्यवस्थापन निधीअंतर्गत जिल्हानिहाय विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत . शुक्रवारी सकाळी 11 वाजता सर्व विभागप्रमुखांसमवेतही अशाच प्रकारे बैठक होणार आहे. कुलगुरु यावेळी संबोघित करणार आहेत .

आपली प्रतिक्रिया द्या