
जगभरात थैमान घालत असलेला कोरोना विषाणू हिंदुस्थानमध्येही जोर पकडून आहे. देशातील रुग्णांचा आकडा 3 लाखांच्या पार गेला असून 8 हजारांहून अधिक मृत्यू झाला आहे. रुग्णसंख्येत रोज 10 हजारांची वाढ होत आहे. यातील काही रुग्णांना कोरोनाची लक्षणेही दिसून आलेली नाहीत. अशातच सरकारने ‘वास घेण्याची क्षमता कमी होणे’ आणि ‘पदार्थाची चव न कळणे’ या दोन लक्षणांचा समावेश कोरोना लक्षणांचा यादीत केला आहे. शनिवारी हा निर्णय घेण्यात आला.
याआधी कोरोनाची लागण झाल्याचे 7 लक्षणाद्वारे कळत होते. यात ताप येणे, छातीत कफ होणे, श्वास घेण्यास त्रास होणे, खोकला येणे, स्नायूमध्ये वेदना होणे, नाकातून पाणी वाहने आणि गळा खराब होणे या लक्षणांचा समावेश होता. त्याच अनुषंगाने चाचणी केली जात होती. मात्र आता यात 2 लक्षणांचा समावेश केल्याने ही संख्या 9 झाली आहे.
https://www.saamana.com/maharashtra-corona-virus-private-lab-corona-sample-test/
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्सने गेल्या आठवड्यात या 2 लक्षणांचा समावेश करण्याची शिफारस केली होती. अनेक रुग्णांना वास न येणे आणि तोंडाची चव कमी होणे अशी लक्षण आढळली होती. त्यामुळे टास्क फोर्सच्या सदस्यांनी बैठकीमध्ये या लक्षणांचा समावेश कोरोना लक्षण म्हणून करण्याची शिफारस केली. त्यामुळे आता यापूर्वीच्या 7 लक्षणांसह नवीन 2 लक्षणाच्या आधारेही चाचणी केली जाणार आहे.
चीनमध्ये कोरोना विषाणू पुन्हा सक्रिय, राजधानी बीजिंगमध्ये ‘लॉकडाऊन’, अनेक बाजार बंद


























































