कोरोनामुळे न्युमोनिया होऊन मृत्यूचे प्रमाण वाढले

1229

कोरोनामुळे पुणे शहरात दीड हजारांपेक्षा अधिक मृत्यू झाले आहेत. आतापर्यंत न्युमोनिया वेगवेगळ्या कारणांमुळे होता. पण सध्या कोरोनामुळे न्युमोनिया होऊन रुग्णांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्यापैकी जवळपास 90 टक्के रुग्णांना अंतिम टप्प्यात न्युमोनिया झाल्याने फुफ्फुसे निकामी होऊन या रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना हा मुळातच श्वसनसंस्था जसे घसा श्वासनलिका आणि फुफ्फुसांवर हल्ला करणारा विषाणू आहे. त्यामुळे शहरात दररोज सर्वसाधारणपणे 20 ते 30 रुग्णांचा कोरोणानामुळे मृत्यू होत आहे. आतापर्यंत पंधराशेपेक्षा अधिक रुग्ण करणामुळे दगावले आहेत. त्यापैकी 50 ते 80 वयोगटातील रुग्णांचा समावेश अधिक आहे. पण या मृत्यू झालेल्या 80 ते 90 टक्के रुग्णांना अंतिम टप्प्यात न्युमोनियासह इतर आजार झाल्याचे निदान झाले आहे. न्युमोनिया सोबतच तीव्र श्वसन विकार या दोन कारणांमुळे अधिकाधिक रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे कोरोना निमित्त ठरत असला तरी खरा मृत्यू मात्र कोरोनामुळे कारणीभूत ठरलेल्या न्युमोनियाने होत असल्याचे कोरोनाच्या मृतांच्या कारणांवरून समोर आले आहे.

न्युमोनिया विषाणू किंवा जीवाणू नाही मात्र विषाणू जीवाणू किंवा बुरशी यामुळे पोलिसांना झालेल्या संसर्गाची एक अवस्था किंवा लक्षण आहे. त्यामुळे वयोवृद्ध, उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयाचा आजार, दम्याचा आजार, कर्करोग, एचआयव्हीग्रस्त असलेल्या रुग्णांमध्ये हे रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने न्युमोनिया होण्याचा धोका अधिक आहे.

न्युमोनिया म्हणजे नेमके काय?
छाती मधील डाव्या व उजव्या बाजूला दोन फुफ्फुसे असतात. आपण घेत असलेला श्वास फुफ्फुसामधील लहान-लहान पिशव्यांमध्ये जातो. तेथून तो रक्तामध्ये मिसळून ज्यावेळी कोरोना संसर्ग होतो त्यावेळी या पिशव्यांमध्ये संसर्ग होऊन त्यांना सूज येते. त्या पिशव्यांमध्ये द्रवपदार्थ अथवा कफ जमतो या अवस्थेला न्युमोनिया झाला असे म्हणतात. त्यानंतर रुग्णाला श्वास घेता येत नाही आणि ऑक्सिजन अभावी रुग्णाचा मृत्यू होण्याचा धोका वाढतो.

न्युमोनिया ची साधी आणि गंभीर लक्षणे

साधी लक्षणे- खोकला, सर्दी, ताप, थंडी इत्यादी

गंभीर लक्षणे- श्वास घेण्यास त्रास होणे, दम लागणे, शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होणे, खोकताना किंवा श्वास घेताना छातीत दुखणे

कोरोनाचा विषाणू मानवी शरीरातील श्वसन व्यवस्था फुफ्फुसे आणि किडनी अशा अवयवांवर हल्ला करतो त्यामुळे कोरोनामुळे न्युमोनिया होण्याची शक्यता आहे. त्यात प्रमुख्याने फुप्फुसे निकामी झाल्याने श्वास घेण्यास त्रास झाल्यास रुग्णाचा मृत्यू होतो- डॉक्टर सुभाष साळुंखे, माजी आरोग्य संचालक, महाराष्ट्र

सर्वसाधारणपणे जे काही रुग्णांचे मृत्यू होत आहेत ते विविध गंभीर आजार असल्यामुळे होत आहे. कोरोनामुळे न्युमोनिया आणि शेवटच्या टप्प्यात एआरडीएस झाल्याने रुग्णाचा मृत्यू ओढवत आहे. सध्याचे रेमडिसिवीर, टोसिलिझुमाब औषध आहेत त्यांचा थोडाफार उपयोग होताना दिसून येत आहे. त्याचबरोबर व्हेंटिलेटरवर असणारे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. त्यामुळे फक्त कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या कमी आहे- डॉक्टर संजय पाठारे वैद्यकीय संचालक, रूबी हॉल क्लिनिक, पुणे

आपली प्रतिक्रिया द्या