संभाजीनगर कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरात थैमान घालणाऱ्या करोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आज रविवारी शहरात आढळून आला आहे. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.रशिया, कझाकिस्तानातून प्रवास करून आलेली महिला असल्याची माहिती समोर आली असून सध्या ती धुत हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.

देशातील इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून या विषाणुचा फैलाव रोखण्यासाठी आज पासून सिनेमागृह, मॉल, शाळा ३१ मार्च पर्यंत बंद करण्याचा महत्वपुर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यातच देशपरदेशातून येणाNया नागरिकांची कसुन तपासणी केल्या जात आहे. राज्यात या रुग्णांची संख्या ३२ झाली आहे.

दरम्यान, संभाजीनगर शहरात रशिया कझाकिस्तानच्या प्रवासावरून परत आलेल्या ५९ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. या महिलेची तपासणी पॉझिटिव्ह आली आहे. तिच्यावर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले आहेत.