
कोरोनासोबत लढा देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी अभिनेता शाहरुख खान याने 25 हजार पीपीई कीट दिले आहेत. याबद्दल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरवरून शाहरूख खान याचे अभार मानले आहेत. शाहरूख खान याचे ट्विटरवरून आभार मानताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, 25 हजार कीटची मदत करणाऱ्या शाहरुख खान यांना धन्यवाद देतो. त्यांच्या मदतीचा कोरोनासोबत लढा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना नक्कीच लाभ होईल. यावर शाहरूखनेही ट्विट करून या लढय़ात आम्ही सोबत आहोत असे सांगतानाच तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय सुरक्षित राहो अशा शुभेच्छाही दिल्या.


























































