शिरूरच्या पूर्व भागात कोरोनाचा शिरकाव, मांडवगण येथील युवकाला झाली लागण*\

753

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात मांडवगण फराटा या गावातील एका तरुणाचा कोरोना तपासणी अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे तालुक्याच्या पूर्व भागात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. संबंधित कोरोनाग्रस्त तरुणाला पुढील उपचारासाठी पुणे येथील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले आहे.

याबाबतची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे व मांडवगण फराटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी मंजुषा सातपुते-इसवे यांनी दिली. संबंधित २४ वर्षीय युवक हा दिल्ली येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता.तो दिल्लीवरून कोल्हापूरच्या मित्रासोबत रेल्वेने प्रवास करून १९ मे रोजी मांडवगण फराटा येथे आला होता.तसेच त्याला त्याच्या घरीच क्वारंटाइन करण्यात आले होते. मात्र, कोल्हापूर येथील मित्राचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव आल्यामुळे व मांडवगणच्या युवकामध्ये कोरोनाची काही लक्षणे आढळल्यामुळे तपासणी केली असता. सदर युवकाचा अहवाल पॉझिटीव आला. त्यामुळे सर्वात आधी खुली झालेली मांडवगण फराटा बाजारपेठ आज पासून बंद ठेवण्यात येणार असल्याच्या निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या