
कोरोना विषाणूचा प्रकोप वाढू लागला तशी मास्कची मागणी वाढू लागली. कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी तोंडाला मास्क बांधणे अत्यावश्यक झाले. मात्र आजपर्यंत तुम्ही कापडाचा अगदी मलमल पासून बनवलेला मास्कही पाहिला असेल. पण रत्नागिरीतील एकाने चक्क चांदीपासून मास्क बनवून घेतला आहे.
रत्नागिरीतील मांडवी येथे रहिवासी शेखर यशवंत सुर्वे यांनी खास कोल्हापूर येथून हा चांदीचा मास्क तयार करून मागविला आहे. या बाबत माहिती देताना शेखर सुर्वे यांनी सांगितले की, एक आवड म्हणून हा मास्क घेतला आहे. याचे वजन 60 असून त्याची किंमत 3900 रुपये आहे.
मी मोबाईलवर चांदीच्या मास्कचा एक फोटो बघितला होता आणि अगदी तसाच मास्क मला हवा होता. म्हणून सोनार हंसराज ज्वेलर्स यांना तो फोटो दाखवला आणि त्यांनी सेम तसाच मास्क कोल्हापूरहून मागवून घेतला. 15 दिवसापूर्वी कोल्हापूरवरून खास माणूस तो घेऊन आला. केवळ एक हौस म्हणून आपण तो घेतल्याचे सुर्वे यांनी सांगितले.






























































