
TCS ने कोरोनावॉरियर्स नावाचा एक डिजिटल कोर्स सुरू केला आहे. कोरोनाविरूद्धच्या लढ्यामध्ये रुग्णसेवेसाठी आरोग्यसेवक तयार करणे हे या कोर्सचे उद्दीष्ट आहे. हा कोर्स विनाशुल्क उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली आहे. https://iur.ls/CoronaWarriors या लिंकवर हा कोर्स उपलब्ध आहे. एकूण सहा तासांचा हा कोर्स असणार आहे. या कोर्सचा फायदा मुख्यत्वे नर्सेस, फार्मासिस्ट्स, रिसेप्शनिस्टस, लॉंड्री, रेडिओलॉजी, तंत्रज्ञ आणि बायोमेडिकल अर्थात जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन करणारे कर्मचारी यांच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. हा कोर्स समजून घेण्यासाठी अतिशय सोपा असल्याची माहिती देण्यात आली आहे. संसर्गावर नियंत्रण ठेवणे, मानसिक आरोग्य राखणे, नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, प्रवासातील सॅनिटायझेशन, अभ्यागतांच्या हालचालींचे व्यवस्थापन, सोशल डिस्टन्सिंगचे नियम आणि प्रयोगशाळेतील तपासणीसाठी जागतिक आरोग्य संघटनेने आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचना अशा विविध विषयांचा या अभ्यासक्रमात समावेश आहे. या कोर्ससाठी हार्वर्ड टी.एच. चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे फॅकल्टी असलेल्या तज्ञांनी दिलेल्या माहितीचा वापर करण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे.
























































