Corona Virus Update – देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 52 हजारावर, तर 15266 पूर्ण बरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 50 हजाराच्या पुढे गेली असून ती संख्या 52,952 इतकी झाली आहे. यापैकी 35902 इतक्या रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर 15266 रुग्ण पूर्ण बरे झाले असून यापैकी अनेकांना घरी सोडण्यात आले आहे. तर 1783 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.

मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ कायम असून 24 तासांत नवीन 769 कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 25 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईत आता एकूण रुग्णसंख्या 10527 वर आणि मृतांचा आकडा 412 वर पोहोचला आहे. धारावीतही  68 नवे रुग्ण आढळल्याने या ठिकाणची एकूण रुग्णसंख्या 733 वर पोहोचली आहे.

मुंबईत गेल्या एका दिवसांत झालेल्या 443 चाचण्या आणि 2 ते 4 मे या कालावधीतील झालेल्या चाचण्यांमधील 215 पॉझिटिव्ह अहवालांचा समावेश असल्याचे पालिकेच्या आरोग्य खात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. गेल्या एका दिवसांत मृत्य झालेल्या 25 जणांमध्ये 15 पुरुष 10 महिलांचा समावेश आहे. यातील 19 जणांना दीर्घकालीन आजार होते, असेही पालिकेने स्पष्ट केले आहे. शिवाय 12 जणांचे वय 60 वर्षांवर, 12 जणांचे वय 40 ते 60 वर्षे आणि एकाचे वय 40 वर्षांपेक्षा कमी होते असे पालिकेने स्पष्ट केले आहे. दरम्यान, गेल्या एकाच दिवसांत 159 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईत आता कोरोनामुक्त होणार्‍यांचा आकडाही 2287 वर पोहोचला आहे.

एका आठवड्यातील रुग्णवाढ

– 30 एप्रिल 417 रुग्ण 20 मृत्यू

– 1 मे 751 रुग्ण 5 मृत्यू

– 2 मे 547 रुग्ण 27 मृत्यू

– 3 मे 441 रुग्ण 21 मृत्यू

– 4 मे 510 रुग्ण 18 मृत्यू

– 5 मे 635 रुग्ण 26 मृत्यू

– 6 मे 769 रुग्ण 25 मृत्यू