बहुरुपी कोरोनाला फसवण्याचा उपाय दृष्टिपथात,तोतया प्रोटिनचे इंजेक्शन रोखणार महामारी

1274

अवघ्या जगाला चिंतेत टाकणारा कोरोना विषाणू रिबो न्यूक्लिक ऍसिडने (आरएनए) बनलेला आहे. मानवी शरीरात प्रवेश केल्यावर हा विषाणू फुफ्फुसे आणि श्वसन नलिकेतील पेशींच्या पृष्ठभागावरील रिसेप्टरद्वारे शरीराच्या पेशींत आणि रक्तात प्रवेश करतो. कोरोनाच्या एसीई-2 या प्रोटीनने बनलेल्या आकर्षित होणाऱया कोरोनाला फसवून कोंडीत पकडण्याचे तंत्र इंग्लंडच्या लिसेस्टर विद्यापीठातील संशोधकांनी अवगत केले असल्याचा दावा केला जात आहे.त्यासाठी हुबेहूब एसीई-2 सारखी तोतया प्रोटिन्स (डेकोय प्रोटीन) या शास्त्रज्ञांनी बनवले आहे. या प्रोटीनचे इंजेक्शन कोविड-19 बाधित रुग्णाला दिल्यावर कोरोनाचे विषाणू तोतया प्रोटिन्सकडे आकर्षित होतो आणि माणसाला या विषाणूचे संक्रमण होत नाही असा संशोधकांचा दावा आहे.

काय आहेत एसीई -2 रिसेप्टर 

मानवी शरीरातील विविध पेशींच्या पृष्ठभागावर एसीइ -2 रिसेप्टर वसलेले असतात. फुफ्फुसावरील हे रिसेप्टर कोरोनाचे खास आवडते घटक आहेत.त्यामुळे फुफ्फुसाच्या पेशींवर असणाऱया एसीई-2 प्रोटिन्सच्या रचनेचा संशोधक बारकाईने अभ्यास करीत आहेत.तशा प्रोटिन्सचा शोध लागला की कोरोनाला पराजित करणे शक्य होईल असा दावा लिसेस्टरच्या संशोधकांनी केला आहे. या संशोधकांच्या शोधाला यश आले की जीवघेण्या कोरोनावर नियंत्रण मिळवणे सोपे होणार आहे. कारण या तोतया प्रोटिन्सवर चिकटून कोरोना निष्प्रभ होईल आणि त्याचा रुग्णांत संसर्ग होणार नाही.

आपली प्रतिक्रिया द्या