
कोरोना महामारीत या रोगाचा संसर्ग केवळ वीस सेकंदात ओळखणारे डीप एक्स-रे उपकरण हिंदुस्थानी तंत्रज्ञानांनी विकसित केले आहे. प्रयागराजच्या मोतीलाल नेहरू राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थानच्या संशोधकांनी विकसित केले आहे. या पोर्टेबल क्ष-किरण स्कॅनरची निर्मिती केवळ 6 लाख रुपये इतक्या कमी खर्चात करण्यात आली आहे.
देशात सार्वजनिक वाहतुकीत कोरोनाच्या संक्रमणाची भीती अधिक आहे. त्यामुळे रेल्वे स्थानके, बस स्थानके आणि विमानतळ या वाहतूक तळांवर एक्स-रे मशीन बसविली जाणार आहे. या यंत्रातील लर्निंग अल्गोरिदममुळे वाहतूक तळाच्या प्रवेश अथवा एक्झिट गेटवरून या यंत्रासमोरून जाणाऱ्या प्रवाशांचा सखोल एक्स-रे उपकरण तात्काळ घेईल आणि अगदी बारकाईनं प्रवाशांच्या शारीरिक अवस्थेची समीक्षा करेल अशी माहिती संशोधकांनी दिली . नव्या यंत्रामुळे देशातील कोरोना बाधितांची वेगाने ओळख करत त्यांच्यावर लवकरात लवकर उपचार सुरू करणे शक्य होणार आहे.
एमएनएनआयटीने बनवली अन्य कोरोना शोधक यंत्रे
एमएनएनआयटीच्या मेकॅनिकल अभियंता विभागाने कोरोना संसर्गाचा शोध घेण्यासाठी विभागाने तापमान डिटेक्टर आणि रुग्णात ऑक्सिजनची कमतरता असल्याची सूचना देणारा पल्स ऑक्सी मीटरही बनवला आहे. सरकारी शोध मोहिमेमुळे कोरोना निदानासाठीची यंत्रे देशात वाजवी किमतीत उपलब्ध होत आहेत.

























































