विचित्र घटना! कोरोनामुळे आईचा मृत्यू झाला, अंत्यविधीला मुलीचाही मृत्यू

1556
death

कोरोनामुळे जगभरात वाढणारा मृतांचा आकडा पाहून धडकी भरायला लागली आहे. यातच एक विचित्र घटना घडली आहे ज्यामध्ये कोरोना आजाराने दगावलेल्या आईच्या अंत्यविधीच्या वेळीस तिच्या मुलीचाही मृत्यू झाला आहे. ज्या महिलेचा कोरोना आजारामुळे मृत्यू झाला तिचे वय 63 वर्ष इतके होते तर तिच्या मुलीचे वय हे 32 वर्ष इतके होते. वृद्ध कोरोनाग्रस्त महिलेच्या अंत्यविधीला बोटावर मोजता येतील इतकी माणसेच हजर होती, ज्यात तिच्या मुलीचाही समावेश होता.

इंग्लंडमधील वॉर्विकशायर भागातील आर्थरस्टोन इते हा अंत्यविधी आयोजित करण्यात आला होता. कोरोनाची लागण झाल्याने ज्युली मर्फी यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी आणि अंत्यविधीसाठी अत्यंक मोजकी लोकं उपस्थित होती. ज्युली यांची शवपेटी खड्ड्यामध्ये सोडत असताना त्यांची मुलगी लॉरा रिचर्डस हिला अस्वस्थ वाटायला लागले होते. तिने स्वत:च्या छातीवर दोन्ही हात घेतले होते आणि ती जोरजोरात ओरडायला लागली की मला ‘श्वास घेता येत नाहीये’ असं म्हणत असतानाच ती कोसळली आणि बेशुद्ध झाली. अंत्यविधीसाठी आलेले तिची मदत करायला धावले. मात्र लॉराला ते काहीही मदत करू शकले नाहीत. तिला रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी सांगितले की तिचा मृत्यू झाला आहे. लॉराचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले. आईच्या अंत्यविदीलाच बहिणीचे जाणे हे माझ्यासाठी अत्यंत धक्कादायक होते असे लॉराची सावत्र बहीण सॅडीने म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या