पंढरपुरात ‘शिवभाजीपाला’ योजना, योजनेमुळे शेतकरी अन ग्रामस्थ खूश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंढरपूरमध्ये शिवभोजन थाळीपासून प्रेरणा घेत ‘शिवभाजीपाला योजना’ सुरू करण्यात आली आहे. पंढरपुरातील महेश साठे यांनी ही योजना सुरू केली असून  दररोज 800 ते 900 कुटुंबांना ताजी भाजी घरपोच केली जात आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये संचारबंदी आहे तथापि नागरिक भाजीपाला आणण्याच्या निमित्ताने सतत घराबाहेर पडत आहेत, यामुळे गर्दी होत आहे. हे टाळण्यासाठी साठे यांनी लॉकडाऊन संपेपर्यंत टाकळी गावातील 25000 नागरिकांना रोज पुरेल इतका भाजीपाला मोफत देण्याचे नियोजन केले आहे. यासाठी त्यांनी थेट शेतातून भाजीपाला खरेदी करायला सुरुवात केली आहे. यामुळे शेतकऱ्यांनाही चांगला मोबदला मिळतोय  आणि नागरिकांना चांगला भाजीपाला मिळत आहे.