कोरोनविरोधाच्या लढाईसाठी केडीएमसीच्या मदतीला धावली ‘डॉक्टर आर्मी’

419

कल्याण डोंबिवलीतील कोरोनाचा विळखा वाढत असल्याने कोरोनविरोधातील या लढ्यामध्ये डॉक्टरांच्या सर्व संघटना ‘कल्याण डॉक्टर आर्मी’च्या छताखाली एकवटल्या आहेत. ‘आयएमए’सह सर्वच प्रमूख संघटना डॉक्टर आर्मीच्या माध्यमातून केडीएमसीच्या मदतीला धावून आल्या आहेत.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सर्व संघटनांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत कल्याण आयएमए, निमा, केम्पा, कल्याण होमिओपॅथक असोसिएशन आदी प्रमूख संघटनांचे शेकडो प्रतिनिधी ‘डॉक्टर आर्मी’च्या छताखाली महापालिका डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून रुग्णसेवा करीत आहेत. मग ते कम्युनिटी हेल्थ क्लिनिक असो की डेडिकेटेड कोरोना सेंटर अशा विविध माध्यमातून कल्याण डोंबिवलीत आज शेकडो डॉक्टर रुग्णांसाठी दिवसरात्र झटत आहेत.

कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा आतापर्यंत अत्यंत झपाट्याने झालेला प्रसार पाहता त्याचा वाढत प्रादुर्भाव रोखणे हे महापालिकेसह सर्वच आरोग्य यंत्रणांपुढील प्रमूख आवाहन आहे. त्यामूळे कल्याणातील रुख्मिणीबाई रुग्णालय, तापाचे दवाखाने, निऑन हॉस्पिटल असो की टिटवाळ्यातील आरोग्य सेवा. या विविध डॉक्टर संघटनांच्या जनरल आणि तज्ञ डॉक्टर आपले कर्तव्य बजावत आहेत. कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर आर्मीचे सदस्य कोरोनाशी दोन हात करत असल्याची माहिती कल्याण आयएमएचे सचिव डॉ. प्रशांत पाटील यांनी दिली. कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे सुरू करण्यात आलेल्या कोवीड केअर सेंटर आणि डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल(निऑन हॉस्पिटल) याठिकाणी महापालिकेच्या डॉक्टर, परिचारिका, सहकाऱ्यांबरोबरच डॉक्टर आर्मीचे सदस्यही कार्यरत झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या