युवा टीम इंडियाच्या 6 खेळाडूंना कोरोना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वेस्ट इंडीजमध्ये सध्या सुरू असलेल्या 19 वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत युवा टीम इंडियाला मोठा धक्का बसलाय. कर्णधार यश धुलसह हिंदुस्थानच्या 6 खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. आयर्लंडविरुद्ध बुधवारी झालेल्या दुसऱया लढतीत या सहा खेळाडूंना वगळण्यात आले. निशांत सिद्धूकडे युवा हिंदुस्थानी संघाचे कर्णधार पद सोपविण्यात आले आहे. संघातील सहा खेळाडूंना कोरोना झाल्याने सामन्यादरम्यान प्रशिक्षकांनच खेळाडूंसाठी मैदानावर पाणी घेऊन जावे लागत आहे. यश धुल आणि उपकर्णधार राशीद यांच्याशिवाय मानव प्रकाश, सिद्धार्थ यादव, आराध्या यादव आणि वासू वत्स यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. आयसीसीने या स्पर्धेसाठी 17 खेळाडूंचा संघात समावेश करण्याची परवानगी दिली होती. त्यामुळे हिंदुस्थानकडे पर्यायी खेळाडू उपलब्ध होते.