तुमच्या शुभेच्छा कोविड योद्ध्यांना समर्पित! वाढदिवस साजरा करणार नाही

शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सोमवारी वाढदिवस. यंदा कोरोनाच्या संकटात मुख्यमंत्र्यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला असून कार्यालय किंवा ‘मातोश्री’ निवासस्थानी भेटून शुभेच्छा देण्याचा आग्रह करू नये. वाढदिवसाला पुष्पगुच्छाऐवजी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करा. या संकटात जनआरोग्य शिबिरे, रक्तदान, प्लाझ्मादान यासारखे समाजोपयोगी उपक्रम राबवून रुग्णांना दिलासा द्या, असे आवाहन त्यांनी केले आहे. जनतेच्या शुभेच्छा मी कोरोनायोद्ध्यांना समर्पित करतो, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कुठेही गर्दी करू नये. त्याचप्रमाणे जाहिरात फलकही लावू नयेत, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

आपली प्रतिक्रिया द्या