गुगल मॅप देणार बस-ट्रेनसह गर्दीच्या ठिकाणांचे अपडेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनापासून बचाव करण्यासाठी गुगलने मंगळवारी एक नवे अपडेट जाहीर केले आहे. गुगल मॅप्समध्ये गुगल असिस्टंट ड्राइविंग मोड हे फिचर सुरू करण्यात आले आहे. गुगलच्या या नव्या अपडेटमुळे अॅन्ड्रॉइड आणि आयओएस युजर्सला ‘कोविड 19’ संबंधित रियर टाइम इन्फॉर्मेशन मिळणार आहे. म्हणजेच जर आपण विकेंडला बाहेर जाण्याचे ठरवत असाल तर गुगल मॅपमधून कोणत्या सार्वजनिक ठिकाणी किंवा बस-ट्रेन यांसारख्या सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांमध्ये गर्दी आहे, त्याचे लाईव्ह अपडेट्स मिळणार आहेत.

दिल्लीत कोरोनाचे आकडे पुन्हा वाढू लागले आहेत. नेमक्या अशा वेळी गुगल असिस्टंट ड्राइविंग मोड फिचर रोलआऊट करण्यात आले आहे. गुगल मॅपचे हे नवे फिचर युजर्सला कामी येणार आहे. गुगल मॅपकडून युजर्सला गर्दीच्या ठिकाणांचे लाईव्ह अपडेट्स मिळणार आहे. तर गेल्या सात दिवसात कोरोनामुळे किती जणांचा बळी गेला हेदेखील समजणार आहे. गुगलने त्यांच्या ब्लॉगमध्ये असे म्हटले आहे की, फीचरच्या मदतीने लोकल अॅथॉरिटीच्या गाइडलाईन्स, टेस्टिंग साइट आणि लिंकची माहिती दिली जाणार आहे.

  • या फिचरच्या व्यतिरिक्त युजर्सला डिलिव्हरी ऑर्डरसुद्धा लाईव्ह पाहता येणार आहे. त्यानुसार, युजर्सला ऑर्डरचा डिलिव्हरी टाइम, पिकअप टाइम अशी माहिती दिली जाणार आहे. तसेच वेटिंग टाइम, डिलिव्हरी चार्जेसबद्दल सांगितले जाणार आहे. गुगल मॅपच्या मदतीने आपल्या आवडीचे फूड रिऑर्डर करता येईल. हे फिचर हिंदुस्थान, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी आणि अमेरिकेच्या अॅन्ड्रॉइड आणि आयओएस युजर्सला उपलब्ध करून दिले आहे.