आयुष प्रणालीव्दारे पन्नास वर्षांपुढील नागरिकांना आयुर्वेद, होमिओपॅथी औषधे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिल्हयातील 50 वर्षापुढील नागरिकांना प्रतिबंधात्मक व रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेद तसेच होमिओपॅथी औषधे पुरविण्यात येणार आहे. यासाठीची गावनिहाय माहिती तात्काळ तयार करण्याचे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थान प्राधिकरणाचे समन्वयक संजय शिंदे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.

कारोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक तसेच नियंत्रणात्मक उपाययोनांचा आढावा आणि नियोजनासाठी आज समन्वयक संजय शिंदे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी वेबेक्स व्हीसीव्दारे जिल्हयातील सर्व गटविकास अधिकारी आणि तहसिलदारांशी संपर्क साधून उपाययोजनांचा आढावा घेतला. आयुष मंत्रालयाने सूचित केल्यानुसार कारोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हयातील 50 वर्षापुढील नागरिकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेद तसेच होमिओपॅथी औषधे पुरविण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. यासाठी मतदान केंद्रनिहाय मतदार याद्यांचा उपयोग व महाआयुष ॲप तयार केले असून, त्यामध्ये ही माहिती भरण्यात येणार आहे. जिल्हयाच्या ग्रामीण भागातील सुमारे 11 लाखा हून अधिक लोकांना आयुष चिकीत्सा प्रणाली अंतर्गत आयुर्वेद तसेच होमिओपॅथी औषधे पुरविण्यात येणार आहेत. यासाठीचा खर्च जिल्हा परिषदेंतर्गत ग्रामपंचायतीमार्फत करण्यात येणार आहे.