वाडा तालुक्यातील हमरापूर येथे 20 लाखांचा अवैध सॅनिटायझरचा साठा पकडला

742
crime

वाडा राज्यमार्गावरील हमरापुर येथे असलेल्या सारू केमिकल कंपनीमध्ये 20 लाखांचे  सॅनिटायझर स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर युनिटने पकडले आहे. या कंपनीमध्ये सॅनिटायझरचे बेकायदेशीर उत्पादन सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर युनिटला मिळताच येथे धाड टाकून हे उत्पादन तात्काळ थांबवले व साठा जप्त केला.

या कंपनीत बेकायदेशीर सॅनिटायझर बनविण्याची मोठी यंत्रणा कार्यरत होती.यावेळी 4 हजार सील केलेल्या सॅनिटायझरच्या बाटल्या, कच्चा माल व यंत्रणा पोलीस व अन्न औषध प्रशासनाने जप्त केली आहे.अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र नाईक यांनी दिली. अन्न व औषध प्रशासनामार्फत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.कंपनी मालक सुलतान लोखंडवाला यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या