तबलिगच्या कार्यक्रमाला हजर असलेल्या तरुणामुळे आणखी एकाला कोरोनाची लागण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शाहूवाडी सारख्या दुर्गम तालुक्यातील उचत गावातील आणि दिल्ली मध्ये तबलिगहून परतलेल्या त्या कोरोना बाधित तरुणाच्या कुटुंबातील महिला सदस्या पाठोपाठ आता 24 वर्षीय चुलत भावालाही कोरोनाची लागण झाल्याचे बुधवारी स्पष्ट झाले.

याबाबत बुधवारी पॉझिटिव्ह अहवाल आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.योगेश साळे यांनी दिली. यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात करोणाबाधीत रुग्णांची संख्या सात पर्यंत पोहोचली असून,यातील सुरवातीचे तीन करोना बाधीतांचे दुस-यांदा अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

मरकजहून देशात परतणा-या तबलीकींमुळे करोनाचा संसर्ग पसरत असल्याने, तसेच प्रशासनाकडून माहिती लपविण्याचा प्रयत्न समोर आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मरकजहून परतलेल्या सर्व तबलिगींची वैद्यकीय तपासणीच्या सख्त सुचना प्रशासनाला दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शाहूवाडी तालुक्यात मरकजहुन आलेल्या उचत येथील तरुणाची तपासणी केली असता, त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.