कोकण किनार पट्टीतील कोलमंडलेला पर्यटन व्यवसाय पुन्हा तेजीत

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कोलमंडलेला कोकण किनारपट्टीतील पर्यटन व्यवसाय हा पुन्हा तेजीत बहरू लागल्याने पर्यटन व्यवसायिकांना चांगले दिवस आले आहेत.

निसर्ग संपन्न कोकणातील फेसाळणाऱ्या निळयाशार समुद्राच्या लाटांची मौज आणि स्वच्छ सुंदर कोकण किनारपट्टी ही पर्यटकांना चांगलीच भुरळ पाडत असल्याने कोकण किनारपट्टी भागात पर्यटकांचा येण्याचा ओघ नजिकच्या काळात खुपच वाढलेला होता. त्यामुळे कोकण किनारपट्टी भागात हॉटेल, रेस्टॉरंट, निवासी न्याहारी योजना, घरगुती खानावळी आदी पर्यटनावर आधारीत विविध प्रकारच्या सेवा देणाऱ्या व्यवसायांचे जाळे येथे उभे राहीले आहे. त्यामुळे कोकण किनार पट्टीतील रहीवाशांना घरच्या घरीच रोजगाराची संधी उपलब्ध झाली होती.

या पर्यटन व्यवसायाच्या रोजगाराच्या उपलब्ध संधीतून पर्यटन व्यवसायिकांची चांगलीच आर्थिक कमाई सुध्दा होत होती त्यामुळे अनेकांनी व्यवसाय वृध्दीसाठी विविध वित्तिय संस्था,

बॅंका आदींकडून कर्ज घेतले होते. नेमके पर्यटन व्यवसाय सुरळीतपणे सुरू असतानाच कोरोना महामारीच्या प्रादुर्भावाने तब्बल 7 महीने पर्यटन व्यवसायातून मिळणाऱ्या आर्थिक कमाईच्या प्राप्तीची साखळी खंडीत झाली. त्यामुळे पर्यटन व्यवसायिक चांगलेच आर्थिक अडचणीत सापडले होते.

मात्र शासनाने 7 महिण्यानंतर हळूहळू अनलॉक केले. या संधीचा फायदा उठवत आपल्या घरीच थांबलेले पर्यटक हे विसाव्यासाठी भटकंतीसाठी पुन्हा घरच्या कोंडमाऱ्यांचा क्षीण घालविण्यासाठी आपल्या कुटंबासह, मित्र मैत्रणिंसह, कंपनीच्या सहकाऱ्यांसह मोठया संख्येने कोकण किनार पट्टीवर दाखल होऊ लागले आहेत. या दाखल होण्याने कोकण किनार पट्टीतील पर्यटन व्यवसायिकांचा मात्र चांगलाच व्यवसाय होत आहे. त्यामुळे हळूहळू पर्यटक व्यवसायिकांची आर्थिक चिंता दूर होत आहे.

राज्यातील विविध शहरातून समुद्र किनार पट्टी भागात दाखल होणाऱ्या पर्यटकांमुळे पुन्हा एकदा कोकण किनार पट्टी भागात पर्यटन व्यवसाय बहरू लागला आहे. त्यामुळे कोकणात पर्यटन व्यवसायाने पुन्हा बाळस धरलं असून गेले 7 महिने रोजगाराची हुकलेली संधी पुन्हा नव्या दमाने सुरू झाल्याने कोकण किनार पट्टीत या बहरणाऱ्या पर्यटन व्यवसायाने व्यवसायिकांची आर्थिक चिंता हळूहळू दूर होणार असल्याचे येणाऱ्या पर्यटक संख्येवरून दिसत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या