सोलापूर साेशल मीडियावर पोलिसांची प्रतिमा मलीन; चौघांवर गुन्हा

521

1 एप्रिल सोशल मीडिया यूट्यूबवर संचारबंदीमध्ये पोलिस मारहाण करतात. नागरिकांचा पाठलाग करत आहेत, असा व्हिडिओ तयार करून अफवा पसरवल्याप्रकरणी चौघांविरुद्ध विजापूर नाका पोलिसात गुन्हा दाखल झाला.ओंकार शिंदे (23), दीपक जाधव (23), अजित बिराजदार (24), ऋषिकेश महागावकर (23) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

29 मार्च रोजी या चौघांनी मिळून व्हिडिओ तयार करून यूट्यूबवर अपलोड केला. दोघे तरुण पळत होते. पोलिस त्यांचा पाठलाग करत होते. त्याखाली काही अपशब्द वापरले होते. संचारबंदी असतानाही खोटी अफवा पसरवली.

आपली प्रतिक्रिया द्या