पुणे – शहरात संचारबंदीचे 278 गुन्हे दाखल

1270

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात जमावबंदी आणि त्यानंतर संचारबंदी करण्यात आली. त्यानुसार पोलिसांच्या आदेशानुसार शहरातील तब्बल 278 जणांवर कारवाई केली आहे. चार पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास तसेच रस्त्यावर फिरण्यास मनाई आहे. असे असतानाही शहरात फिरणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे.

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यानुसार पुण्यात जमावबंदी करण्यात आली होती. रस्त्यावर फिरण्यास देखील मनाई आहे. मात्र, अत्यावश्यक वस्तू आणि मेडिकल सेवा सुरू ठेवण्यात आली आहे. त्यानंतर पुणे पोलिसांकडून शहरातील नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले होते. तरीही नागरिक बाहेर पडत असल्याने वाहने वापरण्यास बंदी घातली. मात्र त्यांनंतर देखील काही बेजबाबदार नागरिक बाहेर पडल्याचे दिसून आले. पोलिसांनी अश्या २७८ जणांवर कारवाई केली आहे. 19 ते 26 मार्च कालावधीत ही कारवाई करण्यात आली आहे.

चौकट-परिमंडळनुसार कारवाई खालीलप्रमाणे

  • परिमंडळ एक – 55
  • परिमंडळ दोन – 82
  • परिमंडळ तीन – 25
  • परिमंडळ चार – 66
  • परिमंडळ पाच – 50
  • एकूण – 278

तर होऊ शकते सहा महिने कैद

संचारबंदीत नियमभंग करणाऱ्या विरुद्ध पोलीस 188 नुसार कारवाई करून न्यायालयात खटला दाखल केला जातो. यानंतर न्यायालय जास्तीत जास्त सहा महिने कारागृहात रवानगी करू शकते. त्यामुळे नागरिकांनी बिनकामाचे बाहेर न पडलेले हिताचे ठरणार आहे. अन्यथा सहा महिने कारागृहात बसण्याची वेळ येऊ शकते.

आपली प्रतिक्रिया द्या