
कोरोनाच्या या संकटात नागरिकांना घरात सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यापासून ते गंभीर रुग्णांच्या मदतीसाठी मराठी कलाकार सध्या सोशल मीडियाचा कापर करत आहेत. नुकतेच अभिनेता अंकुश चौधरी याने हटके पोस्टर शेअर करत चाहत्यांना मास्क घालण्याचे आवाहन केले आहे. या पोस्टरमध्ये ‘दुनियादारी’ या चित्रपटात अंकुश चौधरी आणि स्कप्नील जोशी यांनी साकारलेली दिग्या व श्रेयस ही पात्र झळकत आहेत. महत्त्काचे म्हणजे दोघांच्याही चेहऱयावर मास्क दिसत आहेत. सोबत या चित्रपटातील लोकप्रिय संवादाचा आधार घेत ‘तेरी मेरी यारी, अगोदर मास्क घालू मग करू दुनियादारी’ असा संदेश देण्यात आला आहे. अंकुशच्या या इन्स्टाग्राम पोस्टकर अभिनेता स्कप्नील जोशी याने ‘दिग्या बोलला म्हणजे बोलला’ अशी कमेंट केली आहे. अंकुशची ही पोस्ट चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
































































