मुंबईत आलबेल! लॉकडाऊनची गरज नाही – आयुक्त चहल

1395

कोरोना चाचण्या वेगाने होण्यासाठी पालिकेने प्रिस्क्रिप्शनची अट रद्द केल्यामुळे दररोज 2800 चाचण्या वाढल्या आहेत. यामुळे आता मुंबईत दररोज 6 हजार 800 चाचण्या होत आहेत. परिणामी पालिकेच्या माध्यमातून कोरोना रोखण्यासाठी प्रभावी क्वारंटाईन आणि औषधोपचार केले जात असल्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 70 टक्के झाले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा 50 दिवसांपर्यंत वाढलेला कालावधी देशात सर्वोत्तम आहे. त्यामुळे ठाणे, पुणे या शहरांप्रमाणे मुंबईत पुन्हा टोटल लॉकडाऊनची गरज भासणार नाही, असा विश्वास पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी बोलून दाखवला आहे.

मुंबईत 12 जुलैपर्यंत एकूण कोरोना रुग्णांची संख्या 92,720 वर गेली असली तरी यातील 64 हजार 872 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे मुंबईत आता केवळ 22 हजार 556 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर 70 टक्के झाला आहे. यामध्ये संशयितांना चाचणीसाठी प्रिस्क्रिप्शनची असलेली अट रद्द केल्याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. चाचणीसाठी प्रिस्क्रिप्शनची अट रद्द करणारे मुंबई हे पहिले शहर आहे. याआधी दररोज चार हजार चाचण्या होत होत्या. मात्र आता चाचण्या वाढल्याने पॉझिटिव्ह रुग्ण, क्लोज काँटॅक्टचा शोध वेगाने लागत असल्यामुळे पालिकेला पुढील उपाययोजना वेगाने करता येत आहेत. यामुळेच गेल्या काही दिवसांपासून सरसरी दररोज 1400 नोंदवली जाणारी रुग्णसंख्या आता सरासरी 1200 वर आली आहे. विशेष म्हणजे यातील 200 हून कमी बाधितांनाच लक्षणे असतात. त्यामुळे पालिकेला प्रति दिवस केवळ 200 बेडची गरज लागते, असे आयुक्त म्हणाले, तर लक्षणे नसलेल्यांना कोरोना केअर सेंटर – 2, क्वारंटाईन सेंटर विंâवा सुविधा असल्यास घरीच क्वारंटाइन करण्यात येत असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.

दहा हजार बेड, 250 आयसीयू रिक्त

  • पालिकेची रुग्णालये आणि कोरोना हेल्थ सेंटरवर दररोज येणाNया रुग्णांना बेड उपलब्ध केल्यानंतरही रविवारपर्यंत 10 हजार 130 कोविड बेड आणि 250 आयसीयू बेड पालिकेकडे रिक्त असल्याचेही पालिका आयुक्त चहल यांनी सांगितले.
  • पालिकेने सुरू केलेल्या मोहिमेत ‘चेस द व्हायरस’बरोबरच ‘ट्रेसिंग, ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रिटिंग’ ही चतु:सूत्री प्रभावीपणे राबवण्यात आली आहे. चार प्रमुख रुग्णालयांसह 16 उपनगरीय रुग्णालये, 10 कोरोना केअर सेंटर, 50 मोबाईल डिस्पेन्सरीमुळे जम्बो सुविधा निर्माण झाल्यामुळेच मुंबईत रुग्णसंख्या आटोक्यात येत आहे.
आपली प्रतिक्रिया द्या