पिंपरी – ‘पॉझिटिव्ह’ रुग्णाच्या उपचारादरम्यान संपर्कात आलेले 42 डॉक्टर निगेटिव्ह

800

एका खासगी रुग्णालयातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाच्या उपचारादरम्यान संपर्कात आलेल्या 42 डॉक्टरांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. भीतीचे वातावरण कमी झाले आहे.

शनिवारी पुन्हा एकाचदिवशी सहा जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामध्ये दिल्लीतून आलेल्यांच्या ‘हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मधील चार, अमेरिकेतून आलेला एक आणि पिंपरीतील खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाचा समावेश होता. या रिक्षाचालक असलेल्या रुग्णाचा अपघात झाला होता.  त्याच्यावर पिंपरीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होती. त्याचे ऑपरेशन करीत असताना या रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. दोन दिवसांपूर्वी त्या रिक्षाचालकाचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. त्यामध्ये तो रिक्षाचालक कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. या रुग्णाला यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करणारे 42 डॉक्टर आणि 50 कर्मचारी हे संपर्कात होते. त्यांना रुग्णालयीन प्रशासनाने इतर कुणाच्याही संपर्कात न येता खबरदारी म्हणून सुरक्षित स्थळी ठेवण्यात आले आहे. यामुळे भीतीचे वातावरण, घबराट निर्माण झाली होती 42 डॉक्टरचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविण्यात आले होते. त्याचे रिपोर्ट आता आले असून सर्वजण निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या