अमरावतीत कोरोनाग्रस्तांचा आकडा शतकाच्या उंबरठ्यावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमरावतीत येथे कोरोनाग्रस्तांची संख्या 90 झाली असून कोरोनाग्रस्ताची वाटचाल आता शतकाच्या उंबरठ्यावर पोहचली आहे. आज दुपारी आलेल्या अहवालानुसार सुरुवातीला बडनेरा येथील 23 वर्षीय युवक कोरोनाग्रस्त आला असून तो युवक बडनेरचा असून वाहन चालक आहे. दुसरी कोरोनाग्रस्त महिला 60 वर्षाची असून ती लालखडी येथील रहिवासी आहे. नुकत्याच प्राप्त झालेल्या माहितीनुसार पुन्हा 3 जण कोरोनाग्रस्त आढळुन आले आहे. या पॅरॉडाईज कॉलनी येथील 43 वर्षीय पुरुष, मसानगंज येथील 48 वर्षाचा पुरुष व पाटीपुरा येथील 30 वर्षाचा तरुणाचा अहवाल पॉजीटीव आला आहे. अशा तर्‍हेने अमरावतीत कोरोनाग्रस्तांची संख्या 99 झाली आहे. आज सायंकाळपर्यंत पुन्हा अहवाल आल्यास हा आकडा 100 च्या वर जाऊ शकतो. दिलासादायक बाब म्हणजे आज 6 कोरोनाग्रस्तांना सुट्टी देण्यात येणार आहे. यापूर्वी 56 जणांना दवाखान्यातून सुट्टी देण्यात आली होती. त्यामुळे हा आकडा 62 वर गेला आहे. 100 कोरोनाग्रस्तांच्या तुलनेत 62 जणांना सुट्टी देण्यात आली आहे. ही टक्केवारी 60 आहे.