आज राज्यात 88 नवीन रुग्णांचे निदान; 4 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू

1331

गुरुवारी राज्यात 88 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यातील 54 रुग्ण मुंबई येथील असून 9 जण अहमदनगरचे, 11 पुणे येथील आहेत. याशिवाय 9 जण मुंबईच्या आजूबाजूच्या क्षेत्रातील आहेत. 2 रुग्ण औरंगाबादचे तर प्रत्येकी 1 रुग्ण सातारा, उस्मानाबाद आणि बुलढाण्याचा आहे. यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या 423 झाली आहे. गुरुवारी राज्यात 4 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. या 4 रुग्णांचे तपशील पुढीलप्रमाणे आहेत –

  • 61 वर्षे , पुरुष – हा रुग्ण दिनांक 31 मार्च रोजी नायर रुग्णालयात भरती झाला. त्याला रक्ताचा कर्करोग होता. त्याचा काल दुपारी मृत्यू झाला.
  • 58 वर्षे पुरुष – मूत्रपिंडाचा जुनाट आजार असणारा हा रुग्ण 19 तारखेला भरती झाला होता. त्याला उच्च रक्तदाबाचाही त्रास होता. काल संध्याकाळी त्याचा सायन हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.
  • 58 वर्षे पुरुष – हा रुग्ण २६ मार्च रोजी एका खाजगी रुग्णालयात भरती झाला. त्याचा काल दुपारी मृत्यू झाला.
  • 63 वर्षे, पुरुष या रुग्णाचा मृत्यू कस्तुरबा रुग्णालयात गुरुवारी संध्याकाळी झाला.
    कोविड 19 मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 20 झाली आहे.
आपली प्रतिक्रिया द्या