मुंबईत 1751 नवे कोरोनाबाधित! 27 जणांचा मृत्यू, एकूण रुग्णसंख्या 27 हजार 68 वर

मुंबईत कोरोनाचे नवीन 1751 रुग्ण आढळले आहेत. यामध्ये 17 मे रोजी झालेल्या चाचण्यांमधून पॉझिटिव्ह आलेल्या 276 अहवालांचाही समावेश आहे. यामुळे एकूण रुग्णसंख्या 27 हजार 68 वर पोहोचली आहे. गेल्या एकाच दिवसांत 27 जणांचा मृत्यूही झाला आहे. यामुळे मृतांचा आकडाही आता 909 झाला आहे.

मुंबईत मृत झालेल्या 27 जणांमध्ये 18 पुरुष आणि 9 महिलांचा समावेश आहे. यामध्ये 13 जणांचे वय 60 वर्षांहून अधिक, 13 रुग्णांचे वय 40 ते 60 वर्षे आणि एका रुग्णाचे वय 40 वर्षांपेक्षा कमी होते. दरम्यान, मुंबईत गेल्या एकाच दिवसांत 329 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे एकूण कोरानामुक्त होणार्‍यांची संख्या 7080 वर पोहोचली आहे.

एक नंबरवर दररोज चार हजार कॉल

  • मुंबईकर नागरिकांना कोरोनाबाबमत कोणत्याही प्रकारची माहिती देण्यासाठी पालिकेने सुरू केलेल्या ‘1916’ हेल्पलाइन क्रमांकावर आतापर्यंत प्रत्येक दिवशी सरासरी तब्बल चार हजार कॉल येत आहेत. 24 एप्रिलपासून सुरू केलेल्या या विशेष सेवेसाठी तीन पाळ्यांमध्ये तब्बल 48 कर्मचारी, चार डॉक्टर अहोरात्र आपली सेवा देत आहेत.
  • आतापर्यंत ‘1916’ या क्रमांकावर डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळवण्यासाठी 14253, रुग्णवाहिकेच्या सेवेसाठी 11333, बेडच्या व्यवस्थेसाठी 21309 आणि इतर तक्रारी किंवा शंकांसाठी तब्बल 25539 कॉल आले आहेत. आलेल्या प्रत्येक कॉलनंतर पालिकेच्या माध्यमातून संबंंधित व्यवस्थेकडून कार्यवाही करण्यात येत आहे.
आपली प्रतिक्रिया द्या