संभाजीनगरात कोरोनामुक्त शिलेदारांची संख्या 773 वर; यशाचे प्रमाण 59.42 टक्क्यांवर

306

विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या उपचार केंद्रांमध्ये चांगल्या तर्‍हेचे उपचार घेऊन कोरोना विषाणूवर मात करणाऱ्यांची संख्या आता झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे संभाजीनगरच्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आज सायंकाळपर्यंत जिल्ह्यात एकूण 1301 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी तब्बल 773 रुग्णांनी कोरोना विषाणूंवर मात केली असून हे प्रमाण एकूण संख्येच्या 59.42 टक्के इतके आहे. आज आणखी 89 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे आता केवळ 473 जण अक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू असून हे प्रमाण 36.36 टक्के तर कोरोनाबळींचे प्रमाण 4.22 टक्के असल्याचे सूत्रांनी सांगितले.

संभाजीनगर शहरात 15 मार्च रोजी एका प्राध्यापिकेचे रूपाने पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने संभाजीनगर हादरले होते. त्यानंतर 27 एप्रिलपर्यंत अवघी चित्रे पण संख्या या शहरात होती त्यानंतर 27 एप्रिल पासून आज 25 मे पर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1301 वर धडकली आहे. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून आज सायंकाळपर्यंत ही संख्या 773 वर पोहोचली आहे. त्यामुळे आता उपचार घेणारे रुग्ण केवळ 473 उरले आहेत. या महिनाभरानंतर गेल्या 5 दिवसांत रुग्णसंख्या आता हळूहळू खाली येत आहे. ती आज 16 वर येऊन ठेपली आहे. ही खरोखर दिलासादायक बाब असून मृत्यूची संख्याही ही 55 वर पोहोचली असून हे प्रमाण एकूण संख्येच्या 4.22% टक्के इतके आहे.

आजची स्थिती

  • कोरोनामुक्त रुग्ण 773
  • कोरोनाबळी 55
  • उपचार घेणारे रुग्ण 473
  • एकूण 1301
आपली प्रतिक्रिया द्या