आता एका मिनिटात कोरोना रुग्ण ओळखता येणार! कोरोना लढ्यात संशोधकांना मोठे यश

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याच्या दिशेने संशोधकांना मोठं यश मिळालं आहे. सिंगापूरमधील संशोधकांनी ‘ब्रिथ टेस्ट’ विकसित केली आहे, जी एका मिनिटात कोरोना संसर्ग ओळखू शकते. या टेस्टचे वैशिष्ट्य लक्षात घेऊन सिंगापूरचे आरोग्य अधिकारी मोठ्या प्रमाणात याचा वापर करण्याचा विचार करीत आहेत.

सिंगापूरच्या नॅशनल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी सांगितलं की, या टेस्टसाठी एखाद्या व्यक्तीस डिस्पोजेबल मुखपत्रात जोरात फुंकणे आवश्यक आहे. जे एका मिनिटात त्या व्यक्तीस कोरोनाचा संसर्ग झाला आहे की नाही, हे ओळखू शकते.

संशोधकांनी सांगितलं की, या टेस्टमध्ये तोंडातून हवा बाहेर आल्यानंतर ती एका स्पेक्ट्रोमीटरमध्ये गोळा होते. यानंतर मशीनद्वारे त्याचे विश्लेषण केले जाते आणि त्यात कोरोना विषाणूचे कोणतेही घटक आहे की नाही, हे पाहिले जाते.

विशेष म्हणजे निष्कर्ष काढण्यास मशीन एका मिनिटापेक्षाही कमी वेळ घेते. युनिव्हर्सिटीने सांगितलं की, नवीन तंत्रज्ञान एनयूएसच्या स्टार्ट-अप ‘ब्रेथॉनिक’ने विकसित केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या