जालन्यात कोरोनाचा चौथा संशयीत रुग्ण आढळला

547

जालन्यात चौथा 60 वर्षीय कोरोनाचा संशयित रुग्ण आढळल्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे. या 60 वर्षीय संशयिताला जालना घाटी रुग्णालयात आयसोलेशन वार्डात दाखल केले आहे. सदरील रुग्ण मुंबईमध्ये फिरायला गेला असता विदेशी नागरिकांसोबत संपर्कात आल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर घरी परतलेल्या या रुग्णाला कोरडा खोकला, ताप, आणि घशात दुखायला लागले होते. त्यामुळे या व्यक्तीला जालना घाटी रुग्णालयात आयसोलेशन वार्डात दाखल करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या