CDC चा अहवाल; ‘या’ तीन प्रकारच्या लोकांवर कोरोना लसीचे साईड इफेक्ट्स जास्त, जाणून घ्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना या जागतिक महामारीवर उपाय म्हणून जगभरात लसीकरण सुरू आहे. मात्र लसीकरणानंतर काही लोकांमध्ये साईड इफेक्टस दिसून आल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असून द्विधा मनस्थिती आहे. अर्थात जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) देखील लसीकरणानंतर थोडे साईड इफेक्ट्स होणे सामान्य बाब असल्याचे म्हटले आहे. मात्र काहींमध्ये याचे गंभीर साईड इफेक्ट्स दिसून आल्याने आहेत.

तज्ञांच्या मते लसीकरणानंतर जवळपास सर्वांना थोड्याफार प्रमाणात साईड इफेक्ट्स होणे सामान्य बाबत आहे, मात्र काही लोकांमध्ये या साईड इफेक्ट्सचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले आहे. विशेष करून महिला आणि तरुण वर्गाचे प्रमाण यात जास्त आहे. तसेच ज्या लोकांना आधी कोरोना होऊन गेला आहे त्यांनाही अधिक तीव्र साईड इफेक्ट्स दिसून आले आहेत. त्यामुळे अशा लोकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

लसीकरणानंतर दिसणारे साईड इफेक्ट्स

लसीकरणानंतर थरथरी सुटणे, थकवा, ओकारी होणे, डोकेदुखी, ताप येणे, सूज येणे आणि स्नायू दुखणे यासारखे साईड इफेक्ट्स दिसून आले आहेत. तसेच काही लोकांना कोरोना लस घेतलेल्या जागी सूज आणि वेदानाही जाणवत असल्याचे आढळून आले आहे. 60 वर्षावरील नागरिकांनी लसीकरणानंतर अशक्तपणा आणि थकवा जाणवत असल्याच्या तक्रारीही केल्या आहेत.

महिलांमध्ये साईड इफेक्ट्स जास्त

एका नव्या संशोधनानुसार, पुरुषांच्या तुलनेमध्ये महिलांमध्ये कोरोना लसीचे साईड इफेक्ट्स जास्त दिसून आले आहेत. यासाठी सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (सीडीसी) द्वारे करण्यात आलेल्या अभ्यासानुसार 79 महिलांनी साईड इफेक्ट्सची तक्रार केल्याचे आढळून आले. अर्थात यामागे डॉक्टरांनी एक वेगळेच कारण सांगितले आहे. लस दिल्यानंतर महिलांची प्रतिकारकशक्ती याला वेगाने स्वीकारत असल्याने महिलांमध्ये साईड इफेक्ट्स अधिक दिसत असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.

कोरोनाची लस घेतल्यानंतर ‘या’ 5 गोष्टी बिलकूल करू नका, साइड इफेक्ट्सबाबत WHO म्हणते…

कोरोनाची लागण होऊन गेलेल्यांमध्ये दुष्परिणाम अधिक

ZEO च्या अभ्यासानुसार, कोरोनाची लागण होऊन गेलेल्यांना फायझर लस देण्यात आल्यानंतर त्यांच्यामध्ये साईड इफेक्ट्स अधिक तीव्र दिसून आले. अशा लोकांमध्ये थंडी वाजून आल्यासारखे वाटू लागले. मात्र ज्या लोकांना आधी कोरोना झाला नव्हता त्यांना लस दिल्यानंतर त्यांच्यामध्ये सामान्य साईड इफेक्ट्स दिसले.

मोबाईलमध्ये गुंग होती नर्स, फोनवर बोलता बोलता दिल्या कोविडच्या दोन लस

तरुण वर्ग कचाट्यात

इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)च्या कोची शाखेद्वारे करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, हिंदुस्थानमध्ये ज्येष्ठ नागरिकांपेक्षा तरुणांमध्ये तीव्र साईड इफेक्ट्स दिसून आल्याचे प्रमाण अधिक आहे. आयएमएने 20 ते 29 आणि 80 ते 90 वर्षाच्या नागरिकांवर केलेल्या संशोधनानुसार हे सिद्ध झाले आहे. ‘नवभारत टाइम्स‘ने याबाबत वृत्त दिले आहे.