रामदेव बाबांनी औषध आणले, केंद्राने बाटलीला बुच लावले!

‘कोरोनिल’ लाँच केल्यानंतर अवघ्या काही तासांतच केंद्र सरकारने या औषधाच्या बाटलीला बुच लावले आहे. ‘कोरोनिल’च्या जाहिराती तत्काळ थांबविण्याचे आदेश सरकारने पतंजलीला दिले आहेत. ‘कोरोनिल’ची रुग्णांवर चाचणी करण्यासाठी सीटीआयआरकडून परवानगी घेवून सरकारी यंत्रणेची रितसर मान्यता घेतल्याचे रामदेवबाबा यांनी सांगितले. मात्र, केंद्रीय आयुष मंत्रालयाने आदेश काढून ‘कोरोनिल’बाबत केलेल्या दाव्यांची वैद्यकीय पडताळणी करावी लागेल. त्यामुळे ‘कोरोनिल’ला सरकारची परवानगी नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

ज्यांचा विश्वास आहे त्यांनी घ्यावं -अजित पवार

रामदेवबाबांच्या औषधांवर ज्यांचा विश्वास आहे त्यांनी ‘कोरोनिल’ घ्यावे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. जुलै आणि ऑगस्टचा काळ अधिक कठीण आहे. लोकांनी घालून दिलेली बंधने नीट पाळावीत नाहीतर फार मोठी किंमत मोजावी लागेल, असेही ते पुढे म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या