Video – वाढदिवसाला यायला दिला नकार, नगरसेवकाला चिरडून ठार मारले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आंध्र प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. वाढदिवसाला नकार दिल्याने एका कंत्राटदाराने नगरसेवकाला चिरडून ठार केले आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फूटेजही व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आंध्र प्रदेशच्या कुकुनाडी भागात रमेश, चिना आणि तीन जण एका बारमध्ये दारू पित होते. रमेश महानगरपालिकेत नगरसेवक आहे. चिना हा या भागात कंत्राटदार म्हणून काम करत होता. चिनाने रमेशला एका वाढदिवसाला निमंत्रित केले. रमेशने या वाढदिवसाला जाण्यास नकार दिला. नंतर चिना आपल्या गाडीतून घरी जाण्यास निघाला तेव्हा रमेशही आपल्या गाडीने जाण्यास निघाला. परंतु रमेशला आपल्या गाडीची चावी सापडीत नव्हती. जोपर्यंत आपल्या गाडीची चावी सापडत नाही तोपर्यंत जाऊ नको असे रमेशने चिनाला सांगितले. तरी चिना आपल्या गाडीत बसला आणि जायला निघाला. तेव्हा रमेश चिनाच्या गाडीसमोर उभा राहिला आणि चिनाला अडवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा रागाच्या भरात चिनाने रमेशच्या अंगावरून गाडी नेली. चिनाने रमेशला आपल्या गाडीने तीनवेळा चिरडले. तेव्हा उपस्थित मित्रांनी चिनाला अडवण्याचा प्रयत्न केला परंतु चिना ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. या घटनेत रमेशचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे.

घटनेपूर्वी दोघांमध्ये बाचाबाची आणि

बारमधून निघताना चिना आणि रमेश यांच्यात वाद झाला होता. रमेशने चिनीला मुस्काटात मारले होते असे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. इतकेच नाही तर या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांत वाद असल्याचे त्यांच्या मित्रांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी चिनाला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

andhra-cctv