
ऐन पावसाच्या तोंडावर महानगरपालिकेकडे असलेले कोणतेही यंत्र वापरायचे नाही व खाजगी ठेकेदाराला काम देऊन एक प्रकारे भ्रष्टाचार सुरू असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी करून महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या कारभाराच्या विरोधामध्ये आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे
आज नगरसेवक बोराटे ,तारीक कुरेशी, अजू शेख,अजय लयचट्टी ,यांच्यासह कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेच्या जुन्या कार्यालयामध्ये जाऊन त्यांनी या ठिकाणची माहिती घेतल्यानंतर अनेक धक्कादायक प्रकार उजेडात आलेला आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर नालेसफाईचा विषय हा प्रलंबित राहिलेला आहे, तो विषय काही संपायला तयार नाही, वास्तविक पाहता दोन वर्षांपूर्वी दोन जेसीबी व पोकलंड महानगरपालिकेने स्वतः विकत घेतलेले होते ते घेण्याचा उद्देश तोच होता की शहरातील जे जे कामे प्रलंबित आहेत ते केले जावे हा त्या मागचा उद्देश होता, मात्र त्या उद्देशाला एक प्रकारे महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या हरताळ फासले असून एका ठेकेदाराला नालेसफाईचे काम देऊन यामध्ये कोट्यावधी रुपयांचे बिल काढण्याचा प्रकार महानगरपालिकेचे प्रशासन करत आहे .
आजच या संदर्भातील वर्क ऑर्डर म्हणजेच काम करण्याचा परवानगी संबंधित ठेकेदाराला देण्यात आलेली आहे जर महानगरपालिकेमध्ये स्वतःची यंत्र असताना व सगळं यंत्रसामुग्री असताना त्याचा उपयोग केला जात नाही. या संदर्भामध्ये सर्वसाधारण सभेमध्ये सुद्धा विषय झाला मात्र अधिकारी बोलायला तयार नाही. उलट फक्त थातूरमातूर उत्तरे देऊन विषय भरकटण्याचा प्रकार त्या ठिकाणी झालेला होता. आज नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी जुन्या महानगरपालिकेमध्ये जाऊन या सर्व प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावत या ठिकाणी असलेले साहित्य सुद्धा त्या ठिकाणी तपासून घेतले व त्याच ठिकाणी महानगरपालिकेचे असलेले साहित्य आढळून आले या संदर्भामध्ये नगरसेवक बोराटे यांनी नगरमध्ये प्रशासनाचा गलथान कारभार सध्या सुरू आहे. जनतेच्या पैशाचा अपव्यय मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेला आहे ही बाब अतिशय गंभीर असून जर भविष्यामध्ये महानगरपालिकांच्या प्रशासनाचा कारभार सुधारणा नाही तर आंदोलन केले जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. तसेच जनतेच्या पैशाचा चाललेला अपव्यय तरी थांबावा असे आव्हाने त्यांनी केले. तेच महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी नियुक्त करून जे चालक वाहक असतील त्यांच्याकडून हे कामे करून घेणे गरजेचे होते तसे न करता खाजगी ठेकेदारांना काम देण्याचा उद्देश काय व याला जबाबदार कोण असाही सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे































































